दलित उद्योजकांच्या उत्पादनाचे प्रदर्शन

109 views

Uploaded on April 09, 2010 by punedarshan

दलित उद्योजकांच्या उत्पादनाचे प्रदर्शन

दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजेच डीक्की या संस्थेने दलित उद्योजकांच्या उत्पादनाचे ' दीप एक्स्पो २०१०' हे प्रदर्शन भरवण्याचे योजले आहे . हे प्रदर्शन ४ ते ६ जून मध्ये पुण्यातील इंजिनिअरींग कॉलेजच्या मैदानावर भरविण्यात येणार आहे . भारतात दलित उद्योजकांच अश्या प्रकारच प्रदर्शन पहिल्यांदाच होत असल्याच शुक्रवारी डीक्कीचे चेअरमन मिलिंद कांबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितल . या प्रदर्शनात एकूण १५० दलित उद्योजक सहभागी होणार आहेत , यातील जवळपास ३० महिला उद्योजक आहेत . डीक्की ही संस्था दलित तरुण उद्योग क्षेत्राकडे यावे म्हणून प्रयत्न करीत असेते असही त्यांनी सांगितल . या प्रदर्शनात दलित महिलांच्या बचत गटांना प्रोत्साहन डीक्कीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे . दलित तरुणांनी आणि महिलांनी उद्योग क्षेत्राकडे यावे म्हणजे समाज सुधारेल असही कांबळे म्हणाले. यावेळी डॉ. रजनी इंदुलकर , गिरीष टिळक , रविंद्र सोनावणे , दिलीप कळंबेळकर आदी उपस्थित होते .

Tags:
Dicci, Deep Expo, Industry, Industry In Maharashtra, Dalit Industry, Pune, Punedarshan, Punedarshan.net, News & Events
Comments on दलित उद्योजकांच्या उत्पादनाचे प्रदर्शन

RECOMMENDED CHANNELS