शाहू मोडक यांनी चित्रपटांना तेजस्विता दिली

242 views

Uploaded on April 10, 2010 by punedarshan

शाहू मोडक यांनी चित्रपटांना तेजस्विता दिली
" शाहू मोडक हे सर्व धर्म समभावाला प्रेरणा देणारे दूत होते. त्यांनी मराठी चित्रपटांना तेजस्विता दिली" , अशी भावना केंद्रीय ऊर्जा मंत्री सुशीलकुमार शिदे यांनी व्यक्त केले. ते ज्येष्ठ अभिनेते शाहू मोडक यांच्या आयुष्यावर आधारित 'शाहू मोडक प्रवास एका देव माणसाचा' या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी बोलत होते . शिंदे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अभिनेत्री बेबी शंकूतला होत्या. या पुस्तकाची प्रस्तावना अनंत दीक्षित यांनी लिहिली आहे . पुस्तकाचे लेखन प्रतिभा मोडक यांचे आहे , तर याचे मराठीत शब्दांकन सुधीर गाडगीळ यांनी केले आहे. पुस्तकाचे प्रकाशन अमेय प्रकाशनाच्या वतीने करण्यात आले . यावेळी बोलताना शिदे म्हणाले, "मोडक यांचे वडील ख्रिश्चन धर्मगुरू होते. पण त्यांनी वडिलांप्रमाणे धर्मप्रसाराचे काम केले नाही. त्यांनी मराठी चित्रपटातून २९ वेळा कृष्ण उभा केला, संत ज्ञानेश्वरांची भूमिका केली, स्वामी विवेकानंदांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या वेशात व्यासपीठावर उभे राहिले आणि एका जैन साध्वीशी लग्न केले. त्यांचे जीवन ही एक अजब कहानी आहे. पुस्तक वाचताना डोळे उघडत जातात. खरा मानव धर्म कळत जातो. म्हणून हे पुस्तक महत्त्वाचे आहे." याप्रसंगी बेबी शंकूतला, गाडगीळ आणि मोडक यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मोडक यांच्या पत्नी प्रतिभा मोडक, प्रसिद्ध सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ आणि अमेय प्रकाशनचे उल्हास लाटकर व्यासपीठावर उपस्थित होते.

Tags:
Shahu Modak, Sushilkumar Shinde, Sudhir Gadgil, Prtibha Modak, Dev Manus, Pune, Punedarshan, Punedarshan.net, News & Events
Comments on शाहू मोडक यांनी चित्रपटांना तेजस्विता दिली

RECOMMENDED CHANNELS